वास्तुशास्त्रामध्ये विवाहित महिलांबाबत काही नियम सांगितले आहेत.
जर महिलांनी या नियमांचे पालन केले तर त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी होते.
सर्वात प्रथम लग्न झालेल्या महिलांनी बाहेरून आणलेल्या कोणतयाही गोड पदार्थाचे काही तुकडे खाण्यापूर्वी ते फेकून द्यावे.
तसेच लग्न झालेल्या महिलांनी घरी येणाऱ्या साधूला दान करताना दोन्ही हाताने दान करावे.
लग्न झालेल्या महिलांनी आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी मिळविण्यासाठी पिठात हळद मिसळावी.
तसेच महिलांनी एखादा सदस्य बाहेर गेल्यानंतर लगेच फरशी पुसू नये.
लग्न झालेल्या महिलांनी ओल्या किंवा मोकळ्या केस सोडून कधीही पूजा करू नये.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)