घरातील असा पलंग ठेवणे खूप अशुभ; दररोज होतील भांडणं, पैसा टिकणार नाही

Neha Choudhary
Mar 16,2025


निरोगी आणि आनंदी जीवनासाठी चांगली झोप आवश्यक आहे. यासाठी बेड आणि बेडरूम वास्तुशास्त्रानुसार असावेत.


चुकीच्या पद्धतीने ठेवलेला पलंग किंवा चुकीचा पलंग निवडल्याने जीवनात अनेक समस्या निर्माण होता असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय.


गरिबी, अशांतता, निद्रानाश, अपयश, आजार या समस्या होतात.


घराच्या नैऋत्य दिशेला बेडरूम असणे शुभ मानले जाते. झोपताना बेड बेडरूममध्ये अशा प्रकारे ठेवावा की डोके दक्षिणेकडे असावे. चुकूनही दक्षिणेकडे पाय करून झोपू नका. अन्यथा रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होतो. झोप चांगली होत नाही आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात.


पलंग नेहमी लाकडाचा असावा. जर पलंग सागवान किंवा शीशम लाकडाचा असेल तर ते खूप शुभ असतं. बेड आयताकृती किंवा चौकोनी असावा. लोखंडी पलंगावर झोपणे चांगले नाही. विशेषतः पती-पत्नीने लोखंडी पलंगावर झोपू नये, यामुळे शनिदेवाचा नात्यावर वाईट परिणाम होतो.


बेड कधीही बीमखाली ठेवू नका. त्यामुळे प्रगतीत अडथळे निर्माण होतात. खूप प्रयत्न करूनही काम यशस्वी होत नाही. जर एखादे जोडपे बीमखाली झोपले तर त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या येतात.


बेडरूममध्ये आरसा नसावा आणि कमीत कमी आरसा बेडकडे तोंड करून नसावा, कारण आरशात झोपलेल्या व्यक्तीचे प्रतिबिंब दिसणे अशुभ मानले जाते.


जर बेडमध्ये सामान ठेवण्याची जागा असेल तर त्यात बूट आणि चप्पल ठेवू नका. यामुळे नकारात्मकता वाढते आणि झोपेचा त्रास होतो. तसेच बेडवर लोखंडी वस्तू, रद्दी इत्यादी ठेवू नका. बेड स्टोरेजमध्ये कपडे इत्यादी ठेवणे चांगले.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story