एकमेकांच्या वस्तू वापरताना अनेकदा त्या वस्तू वापराव्यात की नाही, असा विचारही अनेक व्यक्ती करत नाहीत.
वास्तूशास्त्रानुसार इतरांकडून वस्तू मागत त्यांचा वापर करण्याची सवय तुम्हाला कंगाल बनवू शकते, आर्थिक अडचणीत टाकू शकते.
कोणाही दुसऱ्या व्यक्तीचं घड्याळ कधीच वापरू नये. ही गोष्ट शुभसूचक ठरत नाही.
असं म्हणतात की कोणाही व्यक्तीनं इतरांचं घड्याळ घातलं तर, त्याची वाईट वेळ सुरू होते.
कधीच इतरांचे कपडेही वापरू नयेत. यामुळं आर्थिक अडचणी वाढू शकतात.
इतकंच नव्हे, तर दुसऱ्या व्यक्तीचा रुमाल वापरण्याची चूकही कधीच करू नये. असं केल्यास त्या व्यक्तीशी तुमचा वाद ओढावू शकतो.