हिंदू धर्मानुसार काही प्रसंगात किंवा तिथींमध्ये घरात चपात्या भाजणे किंवा बनवणे निषिद्ध मानले गेले आहे. वर्षभरात अशा एकूण पाच तिथी येतात.
असं म्हणतात की, या पाच दिवसांत घरात चपात्या शिजवल्यास अन्नपूर्णा आणि धनलक्ष्मी देवतांचा कोप होऊ शकतो. तसंच, घरात अन्नांची कमतरता जाणवू लागते, अशी मान्यता आहे.
21 ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण आहे. नागपंचमीच्या दिवशी घरात गॅसवर तवा ठेवणे टाळावे, अशी मान्यता आहे. तव्याची प्रतिकृती नागाच्या फण्यासारखी असल्याचे सांगितले जाते.
शास्त्रांनुसार, तवा राहुचे प्रतीक आहे. त्यामुळं यादिवशी जेवण बनवण्यासाठी कढाई किंवा पातेले यासारख्या भांड्याचा वापर करावा, असं म्हणतात.
शरद पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर अवतरते, अशी मान्यता आहे. त्यासाठी शरद पौर्णिमेच्या दिवशी घरात कच्च जेवण खावे, असं म्हणतात.
कोजागिरीच्या दिवशी खीर-पुरीचा नैवेद दाखवावा. तर पौर्णिमेच्या रात्री खीर चंद्राच्या प्रकाशात ठेवून मगच ग्रहण करावी.
शीतला अष्टमीच्या दिवशी शीतला देवीची पूजा केली जाते. त्यादिवशी देवीला शिळ्या अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो.
शास्त्रानुसार, जेव्हा घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यादिवशी घरात चपात्या किंवा भाकऱ्या बनवू नये. घरात तेराव्यानंतरच चपात्या बनवल्या जातात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)