तुरटीचा वापर केल्यास घरात सुख शांती आणि व्यवसायात प्रगती तसेच आर्थिक फायदा होतो.
ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये समस्या असल्यास त्या जागेवर देखील आपण ठेवू शकतो.
घरात सतत भांडण होत असल्यास पाण्याने एक भांडे भरा आणि आपल्या पलंगाखाली ठेवा. आणि रात्री त्यात तुरटी टाकावी. दुसऱ्या दिवशी हे पाणी पिंपळाच्या झाडात टाकावे. असे केल्याने घरातील सदस्यांचे संबंध सुधारतील आणि शांतता राहील.
रात्री भयानक स्वप्ने टाळण्यासाठी तुरटी काळ्या कपड्यात बांधून उशाखाली ठेवा. असे केल्याने भीतीदायक स्वप्ने येणार नाहीत.
तुरटी जाळल्याने वाईट नजरेचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो असे म्हणतात.
तुरटीचा वापर दृष्ट काढण्यासाठी केला जातो असेही म्हणतात.
घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी प्रत्येक खोलीत तुरटीचा तुकडा ठेवा. घरातील वास्तुदोष दूर होतात.
रातील बाथरूममध्ये एका भांड्यात तुरटी ठेवा आणि बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणी पाहू शकणार नाही. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
कर्जमुक्तीसाठी सुपारीच्या पानांवर तुरटी आणि सिंदूर लावून पानाला धाग्याने बांधा. त्यानंतर बुधवारी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवावे. असे केल्याने लवकरच कर्जमुक्ती होईल.
तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. याशिवाय तुरटी काळ्या कपड्यात बांधून घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर, घरात किंवा दुकानात नकारात्मकता राहत नाही. तसेच व्यवसायात प्रगती होते.
सर्व दोषांवर तुरटीचे चमत्कारी फायदे पहायला मिळतात.