विदुर नीतिनुसार कुचकामी लोकांपासून काहीसं अंतर ठेवणं फायद्याचं.
आपल्या फायद्यासाठी समोरच्याची प्रशंसा करत कामसाधूपणा करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहा असंही विदुर नीति सांगते.
कटकारस्थानं रचणाऱ्यांपासून कायम दुरावा ठेवा असं विदुर नीतित सांगण्यात आलं आहे.
कोणत्याही माहितीशिवाय अज्ञानी लोक आपण ज्ञानी असल्याचं भासवतात त्यांच्यापासून दूर राहा असं विदुर नीति शिकवते.
कायमच नकारात्मक बोलणाऱ्यांपासून, उगाचच वाद घालणाऱ्यांपासून चार हात दूर राहिलेलंच बरं.
नशा करणाऱ्या आणि नशा करण्यासाठी उद्युक्त करणाऱ्यांना आयुष्यात फार काळ थारा देऊ नये असं विदुर सांगतात.