जीवनात अनेकदा काही असे प्रसंग येतात जिथं नेमकं काय करावं हे सुचत नाही, यशाची वाट गवसत नाही. अशा वेळी विदुर निती मोठी मदत करते.
विदुर यांना महात्मा अशीही उपाधी देण्यात आली आहे. त्यांच्या नितीमध्ये नैतिकता, राजकारण, अर्थशास्त्र आणि अध्यात्म अशा मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.
विदुर नितीनुसार यश मिळवण्यासाठी काही सवयी अंगी बाणवणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यातील एक म्हणजे कर्म आणि प्रयत्न. या दोन निकषांनी यशाचा मार्ग सर करता येतो.
संतुष्टी आणि त्यागाच्या मार्गाचा अवलंब केल्यास जीवनात शांतता कायम राहते आणि सकारात्मकता वाढते.
जीवनात यश मिळवण्यासाठी धैर्य आणि संयम अतिशय आवश्यत असल्याचं विदुर नितीमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळं कोणतंही काम घाईत करू नये.
सत्य आणि निष्ठेमुळं यशाचा मार्ग नव्यानं उमगतो. त्यामुळं सत्याची साथ कधीही न सोडण्याचा सल्ला विदुर नितीत देण्यात आला आहे. (वरील माहिती उपलब्ध माहितीच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)