तुळशीची माळ आपण खूप जणांच्या गळ्यात पाहिली आहे. खूपवेळा वारकरी मंडळींच्या गळ्यात तर देवळात काही व्यक्ती तुळशीची जपमाळ घेऊन भगवान श्रीविष्णूचं नामस्मरण करत असल्याचं देखील पहायला मिळतं.
तुळशीचे अनन्यासाधारण फायदे आहेत.हिंदू धर्मशास्त्रात तुळस ही देवीदेवतांना प्रिय आहे तर तुळशीच्या रोपात माता लक्ष्मी निवास करते असं मानलं जातं.
तुळशीची माळ परिधान करणे शरीरास फायदेशीर ठरते. ही माळ परिधान केल्याने मन शांत होते आणि आत्मा शुद्ध होतो अस मानलं जात.
तुळशीची माळ ही एक संजीवनी आहे. रोज तुळशीतची माळ परिधान केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि पचनशक्ती वाढते.
तुळशीची माळ घातल्याने चैतन्य वाढते. तसेच संसर्गामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होते.
तुळशीची माळ परिधान केल्याने रक्त प्रवाहात अडथळे निर्माण होत नाहीत. याव्यतिरिक्त हिवताप आणि अनेक प्रकारच्या तापांमध्ये फायदेशीर आहे.
तुळशीची माळ गळ्याभोवती अॅक्युप्रेशर तयार करते ज्यामुळे मानसिक ताणतणाव दूर करते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती आणि स्मरणशक्ती वाढवण्यास देखील मदत करते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)