करवा चौथ हा विवाहित महिलांसाठी सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो.
या दिवशी महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर निर्जला व्रत ठेवतात.
या दिवशी महिला पहाटेपासूनच पूजेची तयारी सुरु करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की या दिवशी किती वाजता स्नान करावे?
करवा चौथच्या दिवशी महिलांनी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे असे मानले जाते.
कारण यामुळे विवाहित महिलांच्या जीवनामध्ये आनंद येतो.
ज्या महिला योग्य वेळी स्नान करतात त्यांना भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो.