हनुमानाचा जन्म चैत्र किंवा कार्तिक कधी झाला?

संकट मोचन हनुमानजी यांची जयंती ही वर्षातून दोनदा साजरी करण्यात येते.

चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला आणि कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते.

या दोन तिथीमागे धार्मिक कारणं आणि अंजनी पुत्राच्या जन्मासंबंधित कथा आहे.

चैत्र महिन्यातील हनुमान जयंती मागील कथा अशी आहे की, लहानपणी झोपेतून उठल्यावर हनुमानजींना भूक लागली. त्यांना एक लाल फळ दिसलं.

हनुमानजींनी वेगाने त्याकडे झेप घेतली पण फळं नव्हते तर सूर्यदेव होते. त्यावेळी राहू सूर्यदेवाला ग्रहण लावणार होते पण हनुमाजींना बघून ते घाबरले.

त्यावेळी राहू इंद्रदेवाकडे धाव घेतली आणि इंद्रदेव प्रकट झाले. त्यांनी हनुमानजींना विजांच्या कडकडाटाने प्रहार करुन बेशुद्ध केलं. म्हणून त्यांना पवनपुत्र म्हटलं जातं. ब्रह्मदेवासह इतर देव वायुदेवाकडे जातात हनुमानजींना दुसरा जन्म मिळतो.

तर कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हनुमानजींचा जन्म हा अंजनीच्या पोटी झाला होता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story