प्रत्येक धर्मात शुभ कार्यात मेहंदी लावणे शुभ मानले जाते. मेहंदी हा सोळा शृंगारामधील एक आहे. साखरपुडा असो, लग्न असो किंव रक्षाबंधन असो, दिवाळीसह कोणताही सण असो, मेहंदी निश्चितच लावली जाते.
हातावर मेहंदी लावणे हे सौभाग्य मानलं जातं. म्हणूनच प्रत्येक खास प्रसंगी मेहंदी लावली जाते. पण तुम्हाला माहितीये का कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी मेहंदी लावणे सर्वात शुभ मानले गेले आहे.
हातावर मेहंदी लावणे हे नशीब आणि प्रेमाचे प्रतीक मानले गेले आहे. असं म्हणतात की मुलींच्या हातावर मेहंदीचा रंग जितका गडद असतो तितकंच पतीचं त्यांच्यावर जास्त प्रेम असतं.
शास्त्रानुसार मेहंदी हा शुक्र ग्रहाशी जोडला गेला आहे. शुक्र हा संपत्ती, समृद्धी, विलासिता, प्रेम आणि प्रणय यांचा कारक मानला गेला आहे. जर मेहंदी योग्य दिवशी आणि वेळी लावली तर व्यक्तीच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धीत वाढ होते असं मानलं गेलं आहे. सुखसोयी आणि सुविधा वाढण्यास मदत मिळते.
मेहंदी शुक्र ग्रहाशी संबंधित असल्याने मेहंदी लावण्यासाठी सर्वोत्तम दिवस शुक्रवार असतो. शिवाय, बुधवारीही मेहंदी लावल्यानेही शुभ परिणाम मिळतात. प्रत्येक सण आणि विशेष प्रसंगी मेहंदी लावावणे खूप शुभ असल्याने नक्की लावा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)