शकुनी मामाचा पाय कोणी तोडला?

शकुनी हा गांधारचा राजा सुबल याचा मुलगा आणि दुर्योधनाचा मामा होता. आपल्या बहिणीने अंध धृतराष्ट्राशी लग्न करावे असे शकुनीला कधीच वाटले नाही.

पण भीष्माच्या दबावाखाली येऊन त्याला तसे करावे लागले. असे म्हणतात की, गांधारीने दोन विवाह केले होते.

ही गोष्ट ज्यावेळी धृतराष्ट्राला समजतात तो संतापला आणि गांधारीच्या संपूर्ण कुटुंबाला तुरूंगात टाकले.

शकुनीचे वडील राजा सुबल आणि त्याच्या सर्व मुलांना हस्तिनापुरात बंदिस्त करण्यात आले.

तुरूंगांत त्यांना खूप कमी अन्न दिले जायचे ज्यामुळे ते सर्व भुकेने मरू लागले.

शकुनीच्या वडिलांनी असे ठरवले की आपले सर्व जेवण आपल्या एकुलत्या एक मुलाला द्यायचे म्हणजे तो जिवंत राहू शकेल आणि आपल्या कुटुंबाच्या मृत्यूचा बदला घेऊ शकेल .

तुरूंगात गांधारीच्या वडिलांनी शकुनीला जिवंत सोडण्याची विनंती केली आणि धृतराष्ट्राने ती मान्य केली.

राजवाड्याच्या मोहेत शकुनी सूड घ्यायला विसरू नये म्हणून सर्वांनी त्याचा एक पाय तोडला जेणेकरून त्याला बदला घेण्याचे लक्षात राहिल.

या सूडाच्या भावनेने शकुनीने कौरवांचे समर्थन केले आणि शेवटी तेच महायुद्धाचे कारण बनले.

VIEW ALL

Read Next Story