महाभारताच्या युद्धात अनेक शस्त्र आणि अस्त्र वापरण्यात आले होते. त्यातील महाबली भीमाची गदा ही सर्वात शक्तिशाली होती.
त्या गदाच्या एका आघातात पृथ्वी हादरली होती. भीमला ही गदा कोणी दिली होती तुम्हाला माहितीय?
महाभारताच्या कथेनुसार, माया राक्षस असुराला बिंदू सरोवरात एक चमकदार वस्तू सापडली. त्याने ती वस्तू राजवाड्यात आणली. ती होती चमत्कारी गदा.
धार्मिक शास्त्रानुसार विश्वकर्मा हे देवतांचं शिल्पकार मानले जातात. तर माया ही दानवांची रचनाकार असल्याचं शास्त्रात उल्लेख आहे. त्यांनी राक्षसांसाठी सुंदर मोठं महाल बांधलं होतं.
एका आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्णाने मायामधील राक्षसाचे प्राण वाचवले होते. श्रीकृष्णाच्या विनंतीवरून राक्षसाने ही गदा भीमाला दिली.
याच चमत्कारी गदाने भीमाने दुर्योधनाची मांडी फोडली होती. धार्मिक ग्रंथानुसार या गदेचे वजन 10,000 हजार मण होतं. म्हणजे इतर गदांपेक्षा दीपपट जास्त होते.
महाभारताच्या कथेनुसार याच भीमाच्या गदेने एकाच फटक्यात तलाव निर्माण केला होता. तो तलाव मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये भीमकुंड नावाने ओळखला जातो.
थिरुपुलियुर महाविष्णू मंदिर केरळमधील अल्लापुझा जिल्ह्यातील चेंगन्नूरजवळ पुलियूर इथे वसले आहेत. असं मानलं जातं की महाभारतातील भीमाने तिरू पुलियूर महाविष्णू मंदिरात भीमाची गदा किंवा गदाचे मोठे शिल्प आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)