कोण होती सूर्यदेवाची कन्या? जिच्याशी लग्न करण्यासाठी श्रीकृष्णाने ठेवला होता प्रस्ताव

Saurabh Talekar
Jun 13,2024

सूर्यदेवाची कन्या

सूर्यदेवाचे दोन सुपुत्र यम आणि शनी यांच्याविषयी अनेकांना माहिती आहे. पण सूर्यदेवाच्या कन्येविषयी तुम्हाला माहितीये का?

विवाह प्रस्ताव

सूर्यदेवाच्या कन्यासोबत विवाह करण्याचा प्रस्ताव खुद्द श्रीकृष्णाने ठेवला होता, अशी धार्मिक ग्रंथानुसार मान्यता आहे.

कालिंदी

सूर्यदेवाला दोन मुली होत्या. पहिली कालिंदी आणि दुसरी भद्रा. कालिंदी शांत स्वभावाची होती तर भद्राचा स्वभाव उग्र होता.

ब्रज धाम

एकदा कालिंदीने सूर्यदेवासमोर पृथ्वीवर जाऊन तपश्चर्या करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी ब्रज धामवर जाऊन तप करण्याचा सल्ला दिला.

तपश्चर्या

कालिंदीने अनेक वर्ष तपश्चर्या केली. त्यावेळी पृथ्वीवर श्रीकृष्णाचा जन्म झाला. कालिंदीने श्रीकृष्णाच्या दर्शनाची देवाकडे मागणी केली.

श्रीकृष्णाचं दर्शन

वासुदेव यांनी जेव्हा श्रीकृष्णासह नदीपात्रात प्रवेश केला तेव्हा, कालिंदीने श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं, असं म्हटलं जातं.

महाभारत युद्ध

जेव्हा श्रीकृष्ण महाभारतातील युद्ध संपवून पुन्हा ब्रजमंडल येथे पोहोचले. तेव्हा त्यांच्यासह अर्जुन देखील होता.

यमुना नदीच्या किनारी

अर्जुन जेव्हा यमुना नदीच्या किनाऱ्यावर पोहोचला तेव्हा त्याने कालिंदीला पाहिलं अन् प्रश्न विचारले.

श्रीकृष्णासोबत लग्न

मी श्रीकृष्णासोबत लग्न करण्यासाठी तपश्चर्या करत असल्याचं कालिंदीने अर्जुनला सांगितलं. अर्जुनने श्रीकृष्णाला संपूर्ण हकिकत सांगितली.

लग्नाची मागणी

श्रीकृष्ण कालिंदीच्या तपश्चर्यावर प्रसन्न झाले अन् सूर्यदेवाकडे जाऊन मुलीसोबत लग्नाची मागणी घातली होती.

VIEW ALL

Read Next Story