महाभारतातील प्रत्येक पात्राची काही ना काही खासियत होती. अनेक पात्रांच्या कथा देखील वेगळ्या आहेत.
तुम्हाला माहीत आहे का? महाभारतातील सर्वात देखणा योद्धा, ज्याची तुलना कामदेवाशी करण्यात आली होती.
श्रीकृष्ण आणि कर्ण यांना सर्वात सुंदर आणि आकर्षक म्हटलं जातं होतं. पण सर्वात देखणा योद्धा म्हणून 'नकुल'ला ओळखलं जातं.
नकुल आणि सहदेव हे माता माद्रीचे जुळे पुत्र होते, ज्यांचा जन्म अश्विनच्या वरदान म्हणून झाला होता.
नकुल इतका देखणा होता की, त्याच्या सौंदर्याची तुलना वासना आणि प्रेमाची देवता कामदेवाशी केली जात होती.
पांडवांच्या वनवासाच्या तेराव्या वर्षी नकुलाने आपलं स्वरूप लपवण्यासाठी त्यांच्या अंगावर धूळ आणि चिखल उडवला होता.
पौराणिक कथेनुसार, तो पाण्याला स्पर्श न करता पावसात घोड्यावर स्वार होऊ शकत होता. त्याला अशी खास कला अवगत होती.