कोणत्याही शुभकार्याआधी नारळ का फोडतात?

Published by: Sayali Patil | Aug 19, 2025

नारळ

कुटुंबात किंवा ओळखीच्या एखाद्या ठिकाणी शुभकार्याआधी नारळ फोडण्याची प्रथा तुम्ही पाहिलीच असेल.

Published by: Sayali Patil | Aug 19, 2025

प्रवास

प्रवासाला निघणं असो, एखादी चांगली गोष्ट घडणं असो किंवा आणखी काही कारण. देवापुढं नारळ फोडला जातोच. पण, असं का करतात हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

Published by: Sayali Patil | Aug 19, 2025

शुभकार्य

शुभकार्याआधी नारळ फोडणं हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. नारळाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश अर्थात शंकराचं प्रतीक समजलं जातं आणि नारळाचे तिन्ही डोळे या देवतांनाच सूचित करतात.

Published by: Sayali Patil | Aug 19, 2025

नारळाचं पाणी

गणरायाचं प्रिय फळ असणारा नारळ फोडताच त्यातून पडणारं पाणी हे पावित्र्याचं प्रतीक समजलं जातं.

Published by: Sayali Patil | Aug 19, 2025

प्रार्थना

नारळ फोडताना प्रगती आणि यशाची प्रार्थना केली जाते. गृहप्रवेश, लग्नसमारंभ, किंवा तत्सम कोणत्याही शुभकार्याआधी नारळ फोडला जातो.

Published by: Sayali Patil | Aug 19, 2025

प्रथा

नारळ फोडण्याची प्रथा ही प्रत्येक समुदायात प्रचलित असून वयोवृद्धांच्या मते नारळ फोडल्यानं वातावरणात सकारात्मकता पसरते आणि नकारात्मकतेचा नायनाट होतो.

Published by: Sayali Patil | Aug 19, 2025

श्रीफळ

थोडक्यात काय, शुभकार्य जिथेजिथे.... नारळ/ श्रीफळ तिथेतिथे... (वरील माहिती सामान्य संदर्भ आणि धारणांवर आधारित असून झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

Published by: Sayali Patil | Aug 19, 2025

VIEW ALL

Read Next Story