अनेकदा पीठ मळून झालं की तयार झालेल्या कणिकेवर तीन बोटांचे ठसे काढतात.
पण कधी विचार केला आहे का की मळलेल्या पिठावर बोटांचे असे ठसे का काढले जातात?
मान्यतेनुसार, हिंदू धर्मात जेव्हा पिंडदान पूर्वजांना अर्पण केले जाते तेव्हा त्यासाठी पिठापासून पिंड बनवला जातो.
असा गोल गोळा पूर्वजांचे अन्न मानले जाते आणि त्यापासून खरतर असे अन्न खाणे पाप आहे.
म्हणून, जेव्हा पीठ मळले जाते तेव्हा त्यावर बोटांचे ठसे बनवले जातात जेणेकरून कणिक ही गाठीसारखे दिसणार नाही.
असे मानले जाते की कणिकेवर बोटांचे ठसे बनवल्यानंतरच पीठ आपण खाऊ शकतो किंवा त्यापासून पदार्थ बनवू शकतो.
यामागे एक मानसिक कारण आहे की कोणतेही काम करताना आपण त्यावर एक छाप सोडतो. म्हणूनच पीठ मळल्यानंतर त्यावर खूण केली जाते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)