नवरात्री हा एक नवचैतन्य निर्माण करणारा एक सण मानला जातो.
या दिवसांमध्ये अनेक जण आपल्याला अनवाणी पायाने चालताना दिसतात,यामागील नेमकं कारण काय असेल जाणून घ्या.
काही जणं तर नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस अनवाणीच असतात, म्हणजे बूट किंवा चप्पल न घालता अनवाणी पायाने वावरतात.
ही पद्धत आपल्याकडे पूर्वापार रुढ आहे.
नवरात्रीच्याआधी पावसाळा संपुन शरद ऋतु सुरु होतो.
सुर्यकिरणांच्या साहाय्याने जास्तीत जास्त व्हिटॅमिन-डी मिळविण्याचा हा ऋतु आहे.
त्यामुळे या काळात अनवाणी राहणे फायदेशीर असते.
नवरात्रीतच्या नऊ दिवस आपली मातीशी नाळ कायम जुळून राहावी.
किंवा पृथ्वीशी आपला संपर्क यावा, मातीचा स्पर्श व्हावा, हा त्यामागचा उद्देश असू शकतो.