देवदेतांच्या पुजेला का वापरतात तांदूळ, काय सांगतं शास्त्र ?

सणावाराला किंवा पुजा करताना तांदूळ हे लागतातच. तांदळाशिवाय कोणतीही पुजा अपूर्ण राहते. जाणून घेऊयात तांदळाला इतकं महत्त्व का दिलं जातं ?

हिंदू शास्त्रात देवदेवतांच्या पुजेसाठी तांदळाला खूप महत्त्व दिलं जातं. तांदळाला सौभाग्याचं प्रतिक मानलं जातं.

लग्नात अक्षता म्हणून तर कधी सुवासिनीची ओटी भरण्यासाठी तांदूळ वापरले जातात.

असं म्हटलं जातं की या जगात पहिलं पीक हे तांदळाचं होतं. हिंदू धर्मामध्ये तांदळाला देवदेतांच्या पुजेसाठी मान दिला जातो.

तांदळाला पुर्णअन्न म्हटलं जातं, पांढऱ्या रंगाचा तांदूळ हा पावित्र्याचं आणि शुद्धतेचं प्रतिक देखील मानलं जातं.

असं म्हणतात की, देवघरातील कलश तांदळात ठेवावा, यामुळे लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते. म्हणून शुभकार्यात तांदळाला प्राधान्य देतात.

दिवाळीला लक्ष्मी पुजनासाठी तांदळाचा वापर केल्याने संपत्तीची भरभराट होते.

शास्त्रानुसार, देव्हाऱ्यात तांदळामध्ये अन्नपुर्णा देवीची मुर्ती ठेवा, असं केल्याने धन धान्याची समृ्द्धी होते. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

VIEW ALL

Read Next Story