2025 हे वर्ष क्रिकेट फॅन्ससाठी चांगलं ठरताना दिसत नाही. अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी मागील 8 महिन्यामध्ये क्रिकेटमधील विविध फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याची टी20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द 13 वर्षांची होती.
चेतेश्वर पुजारा व्यतिरिक्त या वर्षी मार्टिन गप्टिल, तमिम इक्बाल, वरुण आरोन, शापूर जद्रान, वृद्धिमान साहा, दिमुथ करुणारत्ने, हेनरिक क्लासेन, पियुष चावला, निकोलस पूरन, महमुदुल्ला आणि आंद्रे रसेल यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
टेस्ट फॉर्मेट सोडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा रोहित शर्मा आणि विराट कोहली, श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज यांचा समावेश आहे.
2025 मध्ये वनडे क्रिकेट मधून निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मुशफिकुर रहीम सारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे.