22 मार्च पासून आयपीएलच्या 18 व्या सीजनला सुरुवात होणार आहे.
आयपीएल हा फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक स्पर्धा आहे.
यंदा या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार असून आज तुम्हाला धोनीच्या अशा रेकॉर्ड्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांना मोडणं कोहली आणि रोहित सारख्या स्टार खेळाडूंना सुद्धा शक्य नाही.
महेंद्रसिंह धोनी याने आयपीएलच्या सर्वाधिक 226 सामन्यांमध्ये संघाचं कर्णधार म्हणून नेतृत्व केलं आहे.
धोनीने वर्ष 2023 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सला पाचव्यांदा चॅम्पियन बनवलं त्यावेळी धोनीचं वय हे 42 वर्ष 325 महिने होतं.
यामुळे धोनी आयपीएलचे विजेतेपद जिंकणारा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वयस्कर कर्णधार बनला.
आपल्या नेतृत्वात आयपीएल संघाला तब्बल 113 सामन्यांमध्ये विजय मिळवून देणारा धोनी हा आयपीएलमधील एकमेव कर्णधार आहे.