IPL च्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे 5 फलंदाज

Pooja Pawar
Mar 13,2025


22 मार्च पासून इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला सुरुवात होणार असून यंदा स्पर्धेत जवळपास 74 सामने खेळवण्यात येणार आहेत.


दरवर्षी आयपीएलमध्ये अनेक रेकॉर्डस् बनतात आणि मोडतात. तेव्हा आज IPL च्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

यशस्वी जयस्वाल :

आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा रेकॉर्ड युवा फलंदाज यशस्वी जयस्वालच्या नावावर आहे. राजस्थानकडून खेळताना यशस्वीने केकेआर विरुद्ध ही कामगिरी केली होती.

केएल राहुल :

केएल राहुल याने 14 बॉलमध्ये वेगवान अर्धशतक ठोकलं होतं. 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती.

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू पॅट कमिन्स याने 14 बॉलमध्ये अर्धशतकीय कामगिरी करून 56 धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्स खेळताना त्याने ही दमदार फलंदाजी केली होती.

ईशान किशन

आयपीएल 2024 मध्ये ईशान किशन याने मुंबईकडून खेळताना आरसीबी विरुद्ध 16 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं.

अभिषेक शर्मा

आयपीएल 2024 मध्ये हैदराबाद विरुद्ध खेळताना स्टार फलंदाज अभिषेक शर्मा याने 16 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं.

VIEW ALL

Read Next Story