World Cup मध्ये सर्वाधिक धावा कोण करेल? विराट, रोहितऐवजी डिव्हिलिअर्सने घेतलं 'या' खेळाडूचं नाव

Swapnil Ghangale
Sep 26,2023

5 ऑक्टोबरपासून सुरुवात

भारतात खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यान पहिला सामना खेळवला जाणार आहे.

डिव्हिलिअर्सने मांडलं मत

वर्ल्डकप स्पर्धेबद्दल वेगवगेळे तर्क लढवले जात असतानाच या स्पर्धेमध्ये कोणता फलंदाज सर्वाधिक धावा करेल याबद्दलची चर्चाही सुरु झाली आहे. याबद्दल दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलिअर्सनेही मत मांडलंय.

युट्यूब चॅनेलवरुन केलं भाष्य

डिव्हिलिअर्सने त्याच्या युट्यूब चॅनेलवरुन चाहत्यांशी संवाद साधताना सर्वाधिक धावा कोण करेल याबद्दल भाष्य केलं.

विराट-रोहितचा उल्लेख केला नाही

डिव्हिलिअर्सने विराट कोहली किंवा रोहित शर्माचं नाव घेतलं नाही.

या खेळाडूचं घेतलं नाव

सर्वाधिक धावा कोण करेल याबद्दल भाष्य करताना डिव्हिलिअर्सने थेट भारताचा सलामीवीर शुभमन गिलचं नाव घेतलं.

तोच सर्वाधिक धावा करेल

"शुभमन गिल या वर्षी वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल. तो उत्तम कामगिरी करतोय. मी याबाबतीत कायम सलामीवीरांच्या बाजूनेच असतो," असं डिव्हिलिअर्स म्हणाला.

विराटला सूचक प्रकारे नाकारलं

"कधी कधी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारे खेळाडूही सर्वाधिक धावा करु शकतात. मात्र सध्या मी शुभनचेचं नाव घेईन," असं डिव्हिलिअर्सने सांगितलं. यामधून डिव्हिलिअर्सने विराटऐवजी सर्वाधिक धावांसंदर्भात आपली पहिली पसंती शुभमन असल्याचं सूचित केलं.

मी त्याचं नाव घेईन

"शुभमन फार भन्नाट खेळाडू आहे. त्याचं खेळण्याचं तंत्र फारच उत्तम आहे. त्यात तो घरगुती मैदानावर वर्ल्डकप खळतोय. त्याच्यावर थोडं प्रेशर असेल. मात्र मी तरीही सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून त्याचेच नाव घेईन," असं डिव्हिलिअर्स म्हणाला.

स्टाइल आणि तंत्र फारच उत्तम

डिव्हिलिअर्सने पुढे, "शुभमनची फलंदाजीची स्टाइल आणि तंत्र फारच साधं आणि सरळ आहे. तुम्ही हे काही खास खेळाडूंबद्दलच असं सांगू शकता. त्यातही स्टीव्ह स्मिथ आणि शुभमनसारखे खेळाडू अधिक उजवे ठरतात," असं म्हटलं.

उगाच काहीतरी वेगळं करत नाही

"शुभमनसारखे खेळाडू आपल्या तंत्राचा वापर करतात. ते उगाच काहीतरी वेगळं करायला जात नाहीत. ते सामन्यादरम्यान धावांची गती वाढवू शकतात आणि गोलंदाजांवर प्रेशर आणू शकतात," असं डिव्हिलिअर्सने सांगितलं.

एक अर्धशतक आणि एक शतक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये शुभनने एक अर्धशतक आणि एक शतक झळकावलं आहे. त्यामुळे तो आता वर्ल्डकपमध्ये कसा खेळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIEW ALL

Read Next Story