अभिषेक शर्माने मोडला 'गुरु' युवराज सिंहचा रेकॉर्ड

Published by: Pooja Pawar | Sep 22, 2025

टीम इंडियाचा सलामी फलंदाज अभिषेक शर्माने रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर 4 सामन्यात जबरदस्त कामगिरी केली.

Published by: Pooja Pawar | Sep 22, 2025

अभिषेक शर्माने केवळ 24 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. यावेळी त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला.

Published by: Pooja Pawar | Sep 22, 2025

अभिषेक शर्मा हा भारत विरुद्ध पाकिस्तान टी 20 सामन्यात सर्वात कमी बॉलमध्ये अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड युवराज सिंहच्या नावावर होता.

Published by: Pooja Pawar | Sep 22, 2025

युवराज सिंह हा अभिषेक शर्माचा गुरु आणि मार्गदर्शक आहे. युवराज सिंहने अभिषेक शर्माला क्रिकेट ट्रेनिंगमध्येही त्याला बरीच मदत केली होती.

Published by: Pooja Pawar | Sep 22, 2025

एवढंच नाही तर अभिषेक शर्माने सर्वात कमी चेंडूत 50 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड सुद्धा नावावर केला. अभिषेकने टी20 मध्ये फक्त 331 चेंडूत 50 षटकार पूर्ण केले.

Published by: Pooja Pawar | Sep 22, 2025

भारत - पाक टी 20 सामन्यात सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा अभिषेक शर्मा दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी 23 बॉलमध्ये मोहम्मद हफीज याने अर्धशतक ठोकले होते.

Published by: Pooja Pawar | Sep 22, 2025

VIEW ALL

Read Next Story