अफगाणिस्तानच्या नशिबाचं दार उघडलं

इतिहासात पहिल्यांदाच 'या' मानाच्या स्पर्धेसाठी पात्र!

नेदरलँड्सचा पराभव

अफगाणिस्तानने वर्ल्ड कपच्या 34व्या सामन्यात नेदरलँड्सचा 7 गडी राखून पराभव केलाय आणि वर्ल्ड कपमधील 4 था विजय नोंदवला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र

या विजयाबरोबरच अफगाणिस्तान टीम पुढील वर्षी पाकिस्तानात होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरली आहे. वर्ल्ड कपमधील पहिले सात संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी क्वालिफाय करतात.

प्रथमच

अफगाणिस्तानच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच अफगाणी संघांने चॅम्पियन ट्रॉफीसाठी पात्रता मिळवल्याने आनंदोस्तव साजरा केला जात आहे.

चॅम्पियन ट्रॉफी

भारत, साऊथ अफ्रिका यांसोबतच ऑस्ट्रेलियाने देखील चॅम्पियन ट्रॉफीसाठी क्वालिफाय केलं आहे.

न्यूझीलंड आणि पाकिस्तान

याबरोबरच वर्ल्ड कप सेमीफायनलच्या रेसमध्ये असलेल्या न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघाने देखील क्वालिफाय केलं आहे.

यंदाचा वर्ल्ड कप खास

अफगाणिस्तानसाठी यंदाचा वर्ल्ड कप खास राहिला आहे. अफगाणिस्तानने आत्तापर्यंत खेळलेल्या मागील 2 वर्ल्ड कपमध्ये त्यांना 15 सामन्यात 1 विजय मिळवला आला होता.

अफगाणिस्तान

आता यंदाच्या वर्षी अफगाणिस्ताने 7 पैकी 4 सामने खिशात घातले आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये पोहोचली नाही तरी अफगाणिस्तानची टीम यंदा आनंदाने घरी जाईल, हे नक्की.

VIEW ALL

Read Next Story