सचिन तेंडुलकरचा मुलगा ऑलराऊंडर क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर हा आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. मात्र अद्याप या सीजनमधील झालेल्या 12 सामन्यांमध्ये अर्जुनला प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
मुंबई इंडियन्सकडून अर्जुनला 12 पैकी एकाही सामन्यात खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे तो मैदानात वॉटरबॉयचं काम करताना किंवा डगआउटमध्ये बसलेला दिसतो.
अर्जुन तेंडुलकर आयपीएल 2022 पासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. मात्र आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी त्याला मुंबईने रिटेन केलं नाही.
अर्जुनने स्वतःला ऑक्शनमध्ये 30 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर नाव नोंदवलं होतं. मात्र जेव्हा तो ऑक्शन टेबलवर आला तेव्हा पहिल्या राउंडला एकाही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही.
दुसऱ्या राउंडला अखेर मुंबई इंडियन्सने त्याच्यावर बोली लावून त्याची बेस प्राईज 30 लाखांना त्याला करारबद्ध करून घेतलं.
अर्जुनने आतापर्यंत आयपीएलचे एकूण 5 सामने खेळले असून आयपीएल 2023 मध्ये केकेआर विरुद्ध त्याने पदार्पण केले होते.
अर्जुनने 5 सामन्यांमध्ये फलंदाजी करताना 13 धावा आणि गोलंदाजी करताना 3 विकेट्स घेतल्या. अर्जुनला आयपीएल 2025 मध्ये एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळत नसली तरी या सीजनमध्ये किमान 30 लाखांची कमाई ठरलेली आहे.