शब्द कसा तयार झाला?
टेस्ट क्रिकेट म्हणजे संयमाने खेळला जाणारा खेळ पण आता टेस्ट क्रिकेटचं स्वरूप बदलत असल्याचं दिसतंय.
टेस्ट क्रिकेट सर्वात जुणी क्रिकेट पध्दत आहे, टेस्ट क्रिकेटचा सामना पाच दिवसाचा असतो आणि रोज 90 ओव्हर टाकल्या जातात. त्यासोबत प्रत्येक संघ दोनदा फलंदाजी करतात.
टेस्ट क्रिकेटमध्ये आता बॅझबॅालची एन्ट्री होण्याची शक्यता आहे, सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत याची प्रचिती पहायला मिळाली.
इंग्लंड विरुध्द न्यूझीलंडच्या टेस्ट मॅच इंगलंडने बॅझबॅालच्या अंदाजात खेळी केली आणि विजय मिळवला होता.
बॅझबॅाल म्हणजे टेस्ट मॅचमध्ये गोलंदाजाला फक्त धु धु धुवायचं. कितीही विकेट्स पडल्या तरी आक्रमक खेळ सोडायचा नाही, अशी ही संकल्पना.
जाणकारांच्या माहितीनुसार, जेव्हापासून ब्रँडन मॅक्युलमची इंग्लंडच्या प्रशिक्षकपदी निवड झाली, तेव्हापासून बॅझबॅालची सुरुवात टेस्ट क्रिकेटमध्ये झाली.
ब्रँडन मॅक्युलमच्या आक्रमक फलंदाजीमुळे त्याचं टोपन नाव बॅझ असं पडलं. त्यामुळेचं बॅझबॅाल हा शब्द इंगलंडच्या संघाने बनवला आहे.
मॅक्युलमने इंग्लंजच्या फलंदाजांना टेस्ट सामन्यात आक्रमक खेळण्याचे आदेश दिले आणि टेस्ट क्रिकेटचं रूप अॅशेस सामन्यात पालटल्याचं दिसून आलंय.