एशिया कपच्या सुपर-4 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानाच दारुण पराभव केला. क्रिकेट इतिहासातला भारताने पाकिस्तानवर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला.

भारताविरुद्धच्या पराभवानतून सावरत नाही तोच पाकिस्तान क्रिकेट संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तनचा प्रमुख गोलंदाज स्पर्धेतून बाहेर पडलाय.

पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज नसीम शाह एशिया कपमधल्या उर्वरित सामन्याला मुकणार आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात नसीम शाहला दुखापत झाली होती.

नसीमला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याने एशिया कपमधव्या उर्वरित सामन्यात तो खेळू शकणार नसल्याचं पीसीबीने सांगितलं आहे.

एशिया कप स्पर्धेत पाकिस्तानकडून खेळताना नसीम शाहने चार सामन्यात सात विकेट घेतल्या आहेत. भारताविरुद्धच्या सामन्यात नसीमला एकही विकेट घेता आली नव्हती.

भारताविरुद्धच्या सुपर-4 च्या सामन्यात नसीम शाहने 9.2 षटक टाकली, यात त्याने 53 धावा दिल्या. पण सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावं लागलं.

दुखापतीमुळे नसीम शाह स्पर्धेबाहेर पडल्याने पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच दुसरा स्टार गोलंदाज हॅरीर रौफही दुखापतग्रस्त झाला आहे.

नसीम शाहच्या जागी वेगवान गोलंदाज जमान खानचा पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला आहे. पंधरा खेळाडूंच्या यादीत जमान खानचा समावेश करण्यात आला नव्हता.

पाकिस्तानचा सुपर-4 मधला तिसरा आणि शेवटचा सामना 14 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. एशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकावाच लागणार आहे.

VIEW ALL

Read Next Story