भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 मध्ये रविवार 21 सप्टेंबर रोजी सुपर 4 चा सामना खेळवला जाणार आहे.
आशिया कप 2025 ही स्पर्धा टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवली जात असून यापूर्वी झालेल्या सामन्यांमध्ये भारत - पाकिस्तान पैकी कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा विजय मिळवला याविषयी जाणून घेऊयात.
टी 20 फॉरमॅटमध्ये आतापर्यंत भारत - पाकिस्तान संघात 20 सामने खेळवले गेले आहेत.
या 20 सामन्यांपैकी 11 सामने भारताने तर 6 सामने पाकिस्तानने जिंकलेत.
भारत - पाकिस्तान यांच्यात झालेल्या तीन सामने वातावरणामुळे रद्द झालेत.
आशिया कप 2025 मध्ये 14 सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रुप स्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेट आणि 25 बॉल राखून पराभव केला होता.