रोहित शर्माच्या स्वप्नांचा चुराडा करणारी 'ती' अखेर निवृत्त

काळादिवस

काळादिवस..! 19 नोव्हेंबर 2023 ही तारीख भारतीय क्रिकेट चाहते कधीही विसरू शकत नाहीत.

भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा

याच दिवशी टीम इंडियाचं आणि 125 कोटी भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता.

ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकला

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा वनडे वर्ल्ड कप फायनल सामन्यात पराभव करून वर्ल्ड कप जिंकला होता.

'ती' निवृत्त

आता रोहित शर्माचं स्वप्न मोडणारी ती निवृत्त झाली आहे. ती नेमकी कोण? असा सवाल विचारला जातोय.

मार्नस लाबुशेनची बॅट

ही 'ती' दुसरी तिसरी कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेनची बॅट आहे.

संयमी खेळी

जेव्हा 47 धावांवर 3 विकेट्स गेल्या असताना मार्नस लाबुशेनने याच बॅटने 110 बॉलमध्ये 58 धावांची संयमी खेळी केली होती.

बॅटचा फोटो

या बॅटचा फोटो लाबुशेनने इंस्टाग्रामवर पोस्ट केला अन् बॅट निवृत्त करण्याची वेळ आली आहे, अशी पोस्ट मार्नस लाबुशेनने केलीये.

VIEW ALL

Read Next Story