मंदिरात जाऊन पाकिस्तानी क्रिकेटपटूचं देवदर्शन; अयोध्येबद्दल म्हणाला, 'अनेक शतकांपासून..'

प्राणप्रतिष्ठापणेची उत्सुकता

अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेची उत्सुकता सर्व सामान्यांबरोबरच सेलिब्रिटींमध्येही पाहायला मिळाली.

अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंची हजेरी

क्रीडा श्रेत्राबरोबरच क्रिकेटमधील अनेक आजी-माजी खेळाडू 22 तारखेला झालेल्या सोहळ्याला आवर्जून हजर होते.

पाकिस्तानी क्रिकेटपटूही पाहत होता वाट

विशेष म्हणजे एका पाकिस्तानी क्रिकेटपटूही प्राणप्रतिष्ठापणेची आतुरतेने वाट पाहत होता. हा खेळाडू 22 तारखेला मंदिरात जाऊन आला.

कोण आहे हा क्रिकेटपटू?

ज्या क्रिकेटपटूबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे दानिश कनेरिया. दानिश कनेरिया हा हिंदू आहे.

मंदिरामध्ये दर्शनसाठी गेला

दानिश कनेरिया सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. 22 तारखेला तो ह्यूस्टनमधील श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये दर्शनसाठी गेला होता.

मंदिर भेटीची चर्चा

दानिश कनेरियाने या मंदिरात सपत्नीक देवदर्शन घेतलं. त्याच्या या मंदिर भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाला...

'अनेक शतकांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली. प्रतिज्ञा पूर्ण झाली. प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली,' अशी पहिली प्रतिक्रिया दानिश कनेरियाने प्राणप्रतिष्ठापणेनंतर नोंदवली.

61 कसोटीमध्ये 261 विकेट्स

पाकिस्तानकडून खेळताना दानिश कनेरियाने 61 कसोटी सामन्यांमध्ये 261 विकेट्स घेतल्या आहेत.

सर्वाधिक विकेट घेणारा

दानिश कनेरिया कसोटीमध्ये पाकिस्तानसाठी सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू आहे.

VIEW ALL

Read Next Story