बाबर आझमने टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावांचा टप्पा बाबर आझमने पार केला.
अशी कामगिरी करताच बाबर आझमने वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडून काढला आहे.
ख्रिस गेलने 285 डावात 10,000 धावा पूर्ण केल्या होत्या. तर बाबरने केवळ 271 डावांमध्ये 10,000 चा टप्पा पार केला.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झाल्मी संघाकडून खेळताना बाबरने असा विश्वविक्रम रचला आहे. कराची किंग्सविरुद्ध त्याने 10000 धावांचा आकडा गाठला.
बाबर आझमने आत्तापर्यंत टी-ट्वेंटीमध्ये 10 शतकं आणि 83 अर्धशतकं ठोकली आहेत. 271 डाव खेळत त्याने या विश्वविक्रमाला गवासणी घातली.
बाबरने ख्रिस गेलच नाही तर किंग कोहलीचा विक्रम देखील मोडला आहे. विराट कोहलीने 299 डावात 10000 धावांचा टप्पा पार केला होता.