चार वर्षानंतर होणारा भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ पुरस्कार सोहळा हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला आहे. 23 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजेपासून हा सोहळा पाहता येईल.
अशातच आता बीसीसीआयचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला मिळणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता बीसीसीआय अधिकाऱ्यांकडून याची माहिती मिळाली आहे.
वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणारा रोहित शर्मा किंवा विराट कोहलीला देखील नाही तर एका स्टार खेळाडूला हा पुरस्कार मिळणार आहे.
सलामीवीर शुभमन गिलला गेल्या 12 महिन्यांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
शुभमन गिलने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हजार धावा करणारा सर्वात वेगवान खेळाडू बनला आणि या फॉरमॅटमध्ये पाच शतके झळकावली आहेत.
तसेच माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मंगळवारी येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) 'जीवनगौरव पुरस्कार'ने सन्मानित करण्यात येणार आहे.