आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जाहीर झाली आहे. बीसीसीआयने 15 खेळाडूंची नावं जाहीर केली.
या यादीत रिंकू सिंग आणि केएल राहुल यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे आता दोन्ही खेळाडूंचा पत्ता कट झालाय का? असा सवाल विचारला जातोय.
जाहीर झालेल्या टीम इंडियामध्ये बदल करायचे असतील तर सर्व संघांना एक तारीख निश्चित करून दिली आहे.
येत्या 25 मे पर्यंत सर्व देशांचे संघ वर्ल्ड कप स्कॉडमध्ये बदल करू शकतात. आयसीसीने 25 मे ची तारीख निश्चित केली आहे.
जर एखादा खेळाडू जखमी झाला तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी दिली जाऊ शकतो. एवढंच नाही तर काहीही कारण न देता देखील बीसीसीआय टीम बदलू शकते.
आयपीएलमध्ये एखाद्या खेळाडूने जर दमदार कामगिरी केली तर त्याला संधी देण्याचा अधिकार बीसीसीआयकडे 25 मे पर्यंत असणार आहे.