IPL मध्ये भुवनेश्वर कुमारने रचला इतिहास, दिग्गज गोलंदाजांना सोडलं मागे

Pooja Pawar
Apr 08,2025


आयपीएल 2025 मध्ये नव्या संघाकडून खेळत असलेला स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने आयपीएलमध्ये एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.


मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात आरसीबीने 12 धावांनी विजय मिळवला. याच सामन्यात स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारने तिलक वर्माची विकेट घेऊन इतिहास रचला.


भुवनेश्वर कुमारने मुंबई इंडियन्सला चार ओव्हर गोलंदाजी करून 48 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली.


तिलक वर्माची विकेट घेतल्यावर भुवनेश्वर कुमारने आयपीएल करिअरमध्ये 184 विकेट पूर्ण केल्या. यासोबतच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा पेसर ठरला.


भुवनेश्वर कुमारने यासह ड्वेन ब्रावोला मागे सोडलं आहे. ड्वेन ब्रावोने आयपीएल करिअरमध्ये 183 विकेट घेतले होते.


भुवनेश्वर कुमार हा अनेक वर्ष आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळत होता, मात्र आयपीएल 2025 पूर्वी त्याला रिटेन करण्यात आलं नाही आणि आरसीबीने त्याला 10.75 कोटींना करारबद्ध केले.

VIEW ALL

Read Next Story