RCB चं चुकलंच! ज्याला बाहेर केले त्यानंच झळकावलं शतक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 साठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे.

user
user Dec 11,2023


लिलावापूर्वी सर्व 10 संघांनी कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लिलावापूर्वी अष्टपैलू शाहबाज अहमदचा सनरायझर्स हैदराबादशी व्यवहार केला होता.


शाहबाजला संघातून काढून आरसीबीने चूक केली असावी. आता शाहबाजने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार खेळी केली आहे.


बंगालकडून खेळणाऱ्या शाहबाजने हरियाणाविरुद्ध 100 धावांची खेळी केली. शाहबाजने 118 चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि तब्बल षटकार मारले.


29 वर्षीय शाहबाजने भारतासाठी तीन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत. या काळात त्याने एकूण पाच विकेट घेतल्या


विराट कोहलीसारख्या स्टार खेळाडूंनी सजलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लिलावापूर्वी 11 खेळाडूंना सोडले आहे. आरसीबीच्या पर्समध्ये २३.२५ कोटी रुपये आहेत.

VIEW ALL

Read Next Story