भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रांची येथे वनडे सीरिजचा पहिला सामना पार पडला.
या सामन्यात टीम इंडियाचा 17 धावांनी विजय झाला. यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतक लगावले.
विराट कोहलीने वनडे कारकिर्दीतील 52 वं शतक ठोकलं. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 83 वं शतक ठरलं.
या शतकानंतर विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली.
विकासने विराट कोहलीच्या फोटोवर 'Calm before the storm' म्हणजे वादळापूर्वीची शांतता असं कॅप्शन लिहिलं.
पुढच्या स्टोरीमध्ये विकासने विराटाचे शतक केल्यानंतरचे काही फोटो शेअर केले आणि तोंडावर बोट ठेवल्याचं इमोजी लावलं. या इमोजीचा अर्थ 'शांतता किंवा तोंड बंद ठेवा' असा सुद्धा होतो.
विराटची बहिणी भावना हिने सुद्धा विराटच्या शतकाचा फोटो पोस्ट करून त्याला फायर आणि एव्हिल आयचं इमोजी लावलं. विराटच्या भाव बहिणीच्या इंस्टाग्राम स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.