चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड सुरू आहे.
या सामन्यात भारतीय संघाने एकूण चार कॅच चुकवले. त्यामुळे संघाचे क्षेत्ररक्षण चांगले नव्हते.
दरम्यान, न्यूझीलंडच्या डावामधील आठव्या ओवरमध्ये श्रेयस अय्यरने रचिनचा कॅच सोडला.
श्रेयस हा कॅच घेण्यासाठी खूप धावला पण तो कॅच घेऊ शकला नाही.
फायनल सामना पाहण्यासाठी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती.
श्रेयसने कॅच सोडला यावर अनुष्काला विश्वासच बसत नाही असा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.