भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम हे दोघांचीही सध्याच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. साहजिकच दोघांची नेहमीच तुलना केली जाते.
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 76 शतकं केली आहेत. तर बाबर आझमच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30 शतकांची नोंद आहे.
विराट कोहली आणि बाबल आझम यांच्या नावावर क्रिकेटमध्ये अनेक विक्रम जमा आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, या दोघांपैकी कोणाची बॅट सर्वाधिक महागडी आहे?
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली एमआरएफ कंपनीची गेम चेंजर बॅटचा वापर करतो. या बॅटची किंमत जवळपास 72 हजार रुपये इतकी आहे.
तर बाबर आझम निकोल्स कंपनीची बॅट वापरतो. निकोल्सही इंग्लंडची कंपनी आहे. या बॅटची किंमत साधारण 45 हजार रुपये इतकी आहे.
म्हणजेच विराट कोहलीची बॅट बाबर आझमच्या बॅटपेक्षा महागडी आहे. दोघांच्या बॅटमध्ये जवळपास सत्तावीस हजार रुपयांचा फरक आहे.
विराट कोहली आणि बाबर आझम आता एशिया कप कप स्पर्धेत आमने सामने येणार आहे. येत्या दोन सप्टेंबरला श्रीलंकेतल्या कँडीमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत.
विराट कोहली आणि बाबर आझम आतापर्यंत पाच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आमने सामने आले आहेत. यातल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान विजय मिळवलाय. तर तीन सामन्यात भारताने पाकला धुळ चारली आहे.
मजेची गोष्ट म्हणजे पाकिस्तानने जिंकलेल्या दोन्ही सामन्यात बाबरने विराटपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. तर भारताने जिंकल्या तीन सामन्यात विराटने बाबर आझम पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
विराट कोहली 2011 ते 2019 दरम्यान तीन एकदिवसीय वर्ल्ड कप खेळला आहे. यात त्याने 1030 धावा केल्या आहेत. तर बाबर आझम केवळ एक म्हणजे 2019 चा वर्ल्ड कप खेळलाय. यात त्याने 474 धावा केल्या होत्या.