आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल अर्थात आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे आंतररष्ट्रीय महिला क्रिकेट संघात ट्रान्सजेंडर खेळाडूंवर बंदी घालण्यात आलीय.
आयसीसीची या संदर्भात महत्त्वाची बैठक झाली. यानुसार आधी पुरुष नंतर लिंग बदल करुन महिला झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही
सर्जरी किंवा कोणत्याही वैद्यकीय उपचाराने महिला झालेल्या खेळाडूंसाठी हा नियम असेल.
आयसीसीने जाहीर केलेला हा निर्णय केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी असणार आहे. स्थानिक क्रिकेट बोर्ड आपल्या संघात ट्रान्सजेंडर खेळाडूंना खेळवू शकतात.
कॅनाडाची डॅनिले मॅकगाहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू ठरली होती.
पुरुषाची स्त्री झालेल्या खेळाडूसाठी आयसीसीचे काही खास नियम आहेत. या सर्व नियमांत डॅनिले बसते म्हणून तिला आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची परवानगी देण्यात आली होती.
ट्रान्सजेंडर महिला क्रिकेटपटूला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तिची टेस्टोस्टेरॉनची पातळी 12 महिन्यांपर्यंत सातत्याने 5 नॅनोमोल/प्रतिलिटरच्या खाली असावी लागते.