भारतीय क्रिकेट नियामक मंडळ एक खास प्लान तयार करत आहे. या अंतर्गत भारताला फायदाच फायदा होणार आहे. त्यातच भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धाही रंगणार आहे.

मार्च 2028 म्हणजे पुढच्या पाच वर्षात भारतात 88 सामने खेळवले जाणार असून टीव्ही आणि डिजिटल हक्क विकून बीसीसीआयला तब्बल एक अरब डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 8200 कोटींची कमाई करता येणार आहे.

टीम इंडियाच्या प्रस्तावित वेळापत्रकात ऑस्ट्रेविरुद्ध 21 सामने, इंग्लंडविरुद्ध 18 सामन्यांचाही समावेश आहे. भारतीय संघ 25 कसोटी, 27 एकदिवसीय आणि 36 टी20 सामने खेळणार आहे.

भारताने गेल्या पाच वर्षांच्या टर्ममध्ये 94 कोटी 40 लाख डॉलर म्हणजे जवळपास 6138 करोड रुपयांची कमाई केली होती. स्टार इंडियाकडून प्रत्येक सामन्याचे 60 कोटी बीसीसीआयला मिळाले

पण यावेळी बीसीसीआय टीव्ही आणि डिजिटल हक्कांसाठी वेगवेगळे टेंडर मागवणार आहे. लिलावीच प्रक्रिया आयपीएलप्रमाणेच ई-ऑक्शन पद्धतीने करण्यात येणार आहे

आयपीएलम स्पर्धेत डिजिटल हक्क रिलायन्सकडे तर टीव्ही हक्क स्टारने विकत घेतले होते. आयपीएलच्या सोळाव्या हंगामातून बीसीसीआयला निव्वळ 48390 रुपयांची कमाई झाली होती.

भारतात होणाऱ्या सामन्यांच्या डिजिटल हक्कांसाठी डिज्नी, रिलायन्स आणि वायकॉम प्रमुख दावेदार आहेत. डिजीटल हक्कांच्या लिलावातून कोट्यवधींची कमाई बीसीसीआयला होणार आहे.

याशिवाय भारतात वर्षअखेरी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचाही बीसीसीआच्या उत्पन्नावर तगडा परिणाम होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story