आयपीएलनंतर जून महिन्यात टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

टी20 वर्ल्ड कप आधी आयसीसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयसीसीने 'स्टॉप क्लॉक' नियम आता वन डे आणि टी20 क्रिकेटमध्ये कायमस्वरुपी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयसीसीने डिसेंबर 2023 मध्ये 'स्टॉप क्लॉक' नियम चाचणी म्हणून सुरु केला होता. आता एक जूनपासून हा नियम कायम करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

'स्टॉप क्लॉक' नियम टी20 वर्ल्ड कप आणि त्यानंतर सर्व एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात लागू केला जाणार आहे.

'स्टॉप क्लॉक' नियमानुसार गोलंदाजाला दोन षटकांच्यामध्ये 60 सेकंदापेक्षा वेळ घेता येणार नाही. यासाठी अंपायरकडे एक स्टॉप क्लॉक असणार आहे.

एका गोलंदाजांने षटक संपवल्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाने 60 सेकंदाच्या आत दुसरं षटक सुरु करणं बंधनकारक असेल.

एका सामन्यात तीनवेळा हा नियम मोडल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 अतिरिक्त धावा दिल्या जातील.

याआधीच्या स्लो ओव्हर नियमानुसार वन डेत साडेतीन तासात 50 आणि टी20 क्रिकेटमध्ये 1.25 तासात 20 ओव्हर टाकणं बंधनकारक असतं. याचं उल्लंघन केल्यास आर्थिक दंड आकारला जातो.

VIEW ALL

Read Next Story