रांची कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पाच विकेट राखून धुव्वा उडवला. या विजयाबरोबर पाच सामन्यांची मालिकाही 3-1 अशी जिंकली.
रांची कसोटी विजयाचा हिरो ठरला तो युवा विकेटकिपर ध्रुव जुरेल. प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने ध्रुवचा सन्मान करण्यात आला.
या विजयानंतर ध्रुव भारतीय क्रिकेटमध्ये हिरो बनला आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होता. इतकंच नाही तर त्याला एक महागडं गिफ्टही मिळणार आहे.
एमजी कपंनीने ध्रुव जुरेलला एमजी हेक्टर ही महागडी कार गिफ्ट करण्याची घोषणा केली आहे.
एमजी कार कंपनीने एक्स हँडलवर याची माहिती दिलीय. यात त्यांनी म्हटलंय. जुरेल देशाने तुला विकेटच्या पाठि पाहिलंय, आता आम्हाला तुला ड्रायव्हिंग व्हिलच्या मागे पाहायचंय.
ध्रुव जुरेल आणि सर्फराज खानने राजकोट कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. राजकोट कसोटीत दमदार कामगिरीनंतर आनंद महेंद्राने सर्फराजला थार गिफ्ट केली.
थारच्या टॉप मॉडेलची किंमत जवळपास 14 लाख रुपये आहे. तर एमजी हेक्टरच्या टॉप मॉडेलची किंमत 23 लाख रुपये आहे.