आयपीएलच्या सतराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही. यंदाच्या हंगामात चेन्नईला प्ले ऑफही गाठता आलं नाही.

आता आयपीएलचा हंगाम संपलाय आणि पुन्हा एकदा चेन्नईचा स्टार खेळाडू धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु झाली आहे.

चेन्नईबरोबरच धोनीचीही यंदाच्या आयपीएलमध्ये सुमार कामगिरी झाली. त्यामुळे क्रिकेट तज्ज्ञांच्या मते धोनी पुढचा आयपीएल हंगाम खेळणार नाही.

आता टीम इंडियाचे दिग्गज सुनील गावसकर यांनी धोनीच्या निवृत्तीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. धोनी येत्या 7 जुलैला मोठी घोषणा करेल असं गावसकर यांनी म्हटलंय.

पण धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेऊ नये असं मत सुनील गावसकर यांनी वर्तवलं आहे. आणखी काही काळ त्याने खेळत राहावं असंही गावसकरांनी सांगितलं.

धोनीने आयपीएलमधून निवृत्त न होता खेळणं बंद करायला हवंय, जेव्हा वाटेल तेव्हा पुन्हा खेळायला सुरवात करावी असंही गावसकर यांनी सांगितलं.

येत्या 7 जुलैला एमएस धोनी वयाची 43 वर्ष पूर्ण करेल. 2020 मध्ये 7 जुलैलाच धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

VIEW ALL

Read Next Story