सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत आसाम संघाचा खेळाडू रियान परागने दमदार कामगिरी करत इतिहास रचला आहे.
आसामचा कर्णधार असलेल्या रियान परागने केरळाविरोधात नाबाद 57 धावांची खेळी केली. या जोरावर आसामने केरळावर दोन विकेटने मात केली
टी20 क्रिकेटमध्ये सलग सहा अर्धशतक करणारा रियान पराग पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने वीरेंद्र सेहवाग, डेवोन कॉन्वे, जोस बटलरसारख्या खेळाडूंना मागे टाकलं आहे.
सय्याद मुश्ताक अली स्पर्धेत रियानने बिहार (61), सर्विसेस (76), सिक्किम (53), चंदीगड (76) आणि हिमाचलविरोधात (72) अर्धशतकी खेळी केली.
रियान परागने सय्यस मुश्ताक अली स्पर्धेत आतापर्यंत 7 सामन्यात 62,86 च्या अॅव्हरेजने 440 धावा केल्या आहेत. याबरोबरच त्याने सात विकेटही घेतल्या आहेत.
रियान पराग आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो, पण आपीएलच्या सोळाव्या हंगामात त्याची कामगिरी समाधानकारक कामगिरी झालेली नाही.
रियान परागने आयपीएलच्या 54 सामन्यात 16.22 अॅव्हरेजने केवळ 600 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.