कपिल देवबरोबरच्या 'या' दिग्गज खेळाडूला ओळखलंत का?

Published by: Zee Team | Jul 17, 2024

कपिल देव यांच्या बाजूला असलेला हा व्यक्ती कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला. पण ज्यावेळी त्यांचं नाव कळलं त्यावेळी चाहते अवाक झाले.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

वास्तविक कपिल देव यांच्याबाजूला असलेल्या व्यक्तीचं नाव आहे अर्जुन रणतुंगा. श्रीलंकेच्या एका क्रीडा पत्रकाराने हा फोटो पोस्ट केला आहे.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

अर्जुन रणतुंगा हे श्रीलंकेचे दिग्गज क्रिकेटर आहेत. रणतुंगा यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला होता.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

पण अर्जुन रणतुंगा यांचा बदलेला लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

1990 च्या दशकात श्रीलंका क्रिकेटचे स्टार असलेले अर्जुन रणतुंगा आपल्या वजनामुळे प्रसिद्ध होते. पण श्रीलंकेच्या यशस्वी कर्णधारांमध्ये त्यांची गणना होते.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

अर्जुन रणतुंगा श्रीलंकेसाठी 93 कसोटी आणि 269 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली 1996 मध्ये श्रीलंकेने वर्ल्ड कप जिंकला होता.

Published by: Zee Team | Jul 17, 2024

VIEW ALL

Read Next Story