सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मंगळवारी कपिल देव यांनी एक फोटो शेअर केला. हा फोटो पाहून क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला.

कपिल देव यांच्या बाजूला असलेला हा व्यक्ती कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला. पण ज्यावेळी त्यांचं नाव कळलं त्यावेळी चाहते अवाक झाले.

वास्तविक कपिल देव यांच्याबाजूला असलेल्या व्यक्तीचं नाव आहे अर्जुन रणतुंगा. श्रीलंकेच्या एका क्रीडा पत्रकाराने हा फोटो पोस्ट केला आहे.

अर्जुन रणतुंगा हे श्रीलंकेचे दिग्गज क्रिकेटर आहेत. रणतुंगा यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकला होता.

पण अर्जुन रणतुंगा यांचा बदलेला लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

1990 च्या दशकात श्रीलंका क्रिकेटचे स्टार असलेले अर्जुन रणतुंगा आपल्या वजनामुळे प्रसिद्ध होते. पण श्रीलंकेच्या यशस्वी कर्णधारांमध्ये त्यांची गणना होते.

अर्जुन रणतुंगा श्रीलंकेसाठी 93 कसोटी आणि 269 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली 1996 मध्ये श्रीलंकेने वर्ल्ड कप जिंकला होता.

VIEW ALL

Read Next Story