डाव्या हाताचा प्रभात जयसूर्याने जुलै 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध गॉल क्रिकेट मैदानातच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
ऑस्ट्रेलियाचा चार्ली टर्नर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. चार्लिने 50 विकेटचा टप्पा केवळ 6 कसोटी सान्यात पूर्ण केला होता.
याआधी वेस्ट इंडिजच्या अल्फ वेलेंटाइन या खेळाडूने 1951 मध्ये आठ कसोटी सामन्यात 50 विकेट घेण्याचा विक्रम केला होता.
31 वर्षांच्या प्रभात जयसूर्याने केवळ सात कसोटी सामन्यात 50 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.
प्रभात जयसूर्याने आयर्लंडविरुद्धच्या गॉल कसोटी सामन्यात पॉल स्टर्लिंगची विकेट घेत हा विक्रम आपल्या नावावर केला.
प्रभात जयसूर्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 50 विकेटचा टप्पा पार करणारा गोलंदाज बनला आहे.
श्रीलंका क्रिकेट संघाचा फिरकीपटू प्रभात जयसूर्याने क्रिकेट जगतात नवा विक्रम रचला आहे.