सेंच्युरिअनमधल्या लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाने केपटाऊन कसोटीत विजय मिळवत इतिहास रचला
केपटाऊन कसोटीत टीम इंडियाने सात विकेटने विजय मिळवला. या विजयाबरोबर दोन सामन्यांची कसोटी मालिका एक-एक अशी बरोबरीत सुटली
विशेष म्हणजे टीम इंडियाचा केपटाऊनमधला हा पहिला कसोटी विजय ठरला आहे. केपटाऊनमध्ये टीम इंडिया सहा सामने खेळलीय आणि चार सामन्यात पराभव पत्करावा लागलाय.
अझरुद्दीन, सचिन, द्रविड, धोनी आणि विराट कोहली सारखे दिग्गज खेळाडूही केपटाऊनमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकले नव्हते. पण रोहित शर्माने अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली आहे.
रोहित शर्माचा कसोटी कर्णधार म्हणून हा पहिलाच दक्षिण आफ्रिका दौरा आहे. आणि पहिल्याच दौऱ्यात रोहितने इतिहास रचलाय.
दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये कसोटी साना जिंकणारी टीम इंडिया ही पहिली आशियाई टीमही ठरली आहे.
केपटाऊन कसोटीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात विकेटने पराभव केला. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमहाने प्रत्येकी सहाव विकेट घेतल्या.