आयपीएलमधल्या दमदार कामगिरीच्या जोरावर शुभमन गिलची टीम इंडियात निवड झाली. पण वेस्टइंडिज दौऱ्यात तो सपशेल अपयशी ठरतोय.
विंडिज संघाची गोलंदाजी प्रचंड कमकुवत आहे. पण त्यांच्यासमोरही शुभमन गिलला मोठी धावसंख्या करता येत नाही
विंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात शुभमन गिलने केवळ 55 धाव्या केल्या. त्याने नाबाद 29 धावांचा समावेश आहे.
पहिल्या कसोटीत शुभमनने 6 धावा केल्या. तर दुसऱ्या कसोटीत पहिल्या इनिंगमध्ये 10 तर दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 29 धावा केल्या.
कसोटीत फ्लॉप ठरल्यानंतरही शुभमनला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं. पण विंडीजविरुद्धच्या पहिल्याच वन डेत त्याने केवळ 7 धावा केल्या.
आता 29 जुलै आणि 1 ऑगस्टला होणाऱ्या पुढच्या दोन एकदिवसीय सामन्यात शुभमन गिल फॉर्मात येणार का याकडे लक्ष लागलं आहे.
गिलने आतापर्यंत खेळलेल्या 25 एकदिवसीय सामन्यात 62.76 च्या अॅव्हरेजने 1318 धाव्या केल्या आहेत.
आयपीएलमध्ये शुभमनची बॅट चांगलीच तळपली होती. त्याने 17 सामन्यात तब्बल 890 धावा केल्या, सोळाव्या हंगामात तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.
कसोटी क्रिकेटचा विचार केला तर 18 कसोटी सामन्यात शुभमन गिलने 32.20 च्या अॅव्हरेजने 966 धावा केल्या आहेत.
तर शुभमन गिल आतापर्यंत 6 टी20 सामने खेळला आहे. यात त्याने 202 धावा केल्या आहेत.